व्हिडीओमध्ये एक्सप्रेसचा स्पीड वाढवला…रेल्वे मंत्री झाले ट्रोल

67

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशातील सगळ्यात वेगवान रेल्वे गाडीची ट्रायल झाली असून रेल्वे 18 च्या ऐवजी आता या गाडीला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच एक टि्वट केले. त्यात त्यांनी या गाडीचे कौतुक करताना व्हिडीओमध्ये गाडी मूळ वेगापेक्षा अधिक वेगात धावताना दाखवली. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

गोयल यांनी नुकतेच एक टि्वट केले आहे. त्यात त्यांनी या गाडीबद्दल बोलताना सांगितले की हा एक पक्षी आहे. एक विमान आहे. मेक इन इंडीया अंतर्गत बनवण्यात आलेली ही हिंदुस्थानमधील सर्वात पहीली सेमी हाय स्पीड गाडी आहे. ही वेगात धावते.

गोयल यांच्या या टि्वटनंतर मात्र नेटकरी व अनेक राजकीय पक्षांनी गोयल यांना ट्रोल केले. काही जणांनी व्हिडीओत गाडीचा वेग का वाढवून दाखवता ? असा सवाल केला. तर चंदीगढ काँग्रेस पक्षानेही रेल्वे मंत्र्याच्या टि्वटवरील व्हिडीओवर प्रतिक्रीया देताना म्हटले की तुम्ही तर कमालच केली आहेत. व्हिडीओत गाडीचा वेग वाढवलात. तर काही जणांनी ही गाडी 180 किमी ताशी वेगाने धावत असताना व्हिडीओमध्ये तिचा वेग वाढवून दाखवण्याची काय गरज होती. तर एकाने हा व्हिडीओ भाजपच्या आयटी सेलने एडीट केलाय का ? मग अजून जरा गाडीचा वेग वाढवा ना. असे असेल तर बुलेट ट्रेनसाठी जपानची गरजच काय असा खोचक प्रश्न विचारत भाजपला ट्रोल केले आहे. तर एकाने व्हिडीओमध्ये गाडीचा वेग वाढवून दाखवत लोकांना मूर्ख बनवणं योग्य नसल्याचं म्हटल आहे. तर सुनील चन्नावार या नेटकऱ्याने वचन तर बुलेट ट्रेनचं दिलं होते. सेमी हाय स्पीड ट्रेनचं नाही.जपानहून बुलेट ट्रेन कधी येणार प्रभु? असा सवालही केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या