सिद्धूमुळे पंजाबमध्ये नुकसान; पक्ष कार्यकर्त्यांची राहुल गांधींकडे तक्रार

45

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिद्धू यांच्यात वाद उपाळून आला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे नुकसान होण्यास सिद्धूच जबाबदार असल्याची तक्रार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

नवज्योत सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि पक्ष प्रभारी आशा सिंह यांच्याकर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. अशाप्रकारची वक्तक्ये करून सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने निवडणुकीदरम्यान, पक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा आरोप पंजाबमधील नेत्यांनी केला आहे. सिद्धू आणि त्यांच्या पत्नीनीने पक्षाच्या नेत्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबतचे व्हिडीओ काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या