कॅशबॅक देणारे गूगल-पे, फोन-पे सुस्साट; मोदींचे भीम अॅप पिछाडीवर

13


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या भीम अॅपला घरघर लागली आहे. डिजिटल इंडियाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल ट्रान्झॅक्शन अॅपवर कॅशबॅकचा लाभ फार कमी मिळत असल्याने ग्राहकांनी भीम अॅपकडे पाठ फिरवत पेटीएम व गूगल पे ला पसंती दिली आहे.

एका इंग्रजी वृतपत्राने याबद्दल माहिती दिली आहे. त्यात जानेवारी महिन्यात पेटीएमद्वारा एकूण 21 कोटी रुपयांची आर्थिक देवाण घेवाण झाली. तर गूगल पे आणि फोन पे वरून 20 कोटी रुपयांचे आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देखील (NPCL) युपीआय ट्राझे्क्शनचा डाटा सादर केला आहे. ज्यातील माहितीनुसार गेल्या महिन्यात 60 कोटी रुपयांची पैशांचे व्यवहार करणाऱ्या अॅपवरून देवाणघेवाण झाली आहे. तर डिसेंबरमध्ये 62 कोटी रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. यातही भीम अॅपच्या तुलनेत गूगल पे व पेटीएमवरूनच जास्त पैशांचे व्यवहार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भीम अॅपमधून डिसेंबर महिन्यात 10 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली तर हाच आकडा जानेवारीत 14 कोटींवर आल्याचे समोर आले आहे.

पेटीएम, गूगल पे व इतर फोन पे अॅपवर ट्रान्झेक्शन केल्यावर कंपन्या बऱ्यापैकी कॅशबॅक देतात. पण भीम अॅपवर कॅशबॅकचा लाभ फार कमी प्रमाणात मिळतो . त्यामुळे ग्राहकांनी भीम अॅपला टाटा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या