मुलीला मारहाण करणार्‍या व्हायरल व्हिडीओतील मुलाची ओळख पटली, पोलिसांकडून अटक


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीच्या टिळक नगर भागात एक तरुणीला बेदम मारहाण करणार्‍या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तरुणाला शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणाचे नाव रोहित तोमर आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रोहितला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी दिल्ली पोलिसाचा मुलगा आहे की नाही याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरवर माहिती देताना म्हटले की “अशा प्रकारचा व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला असून दिल्ली पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” तसेच यासंबधात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

पोलिसाच्या मुलाची तरुणीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल