उन्हाळ्यात घ्या हे कूल कूल डाएट !

153

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. पण तरीही कामानिमित्त प्रत्येकाला घराबाहेर पडावचं लागतं. मात्र उन्हात जास्तवेळ राहील्यास डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणं) होऊ शकतं. यामुळे या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातही आरोग्याच्या काळजीची सुरुवात ही डाएट पासून होत असल्याने या दिवसात काय खावं हे जाणून घेणं महत्वाच आहे.

watermelon-2

कलिंगड

या दिवसात बाजारात कलिंगड मुबलक प्रमाणात मिळतात. त्यात व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी असल्याने कलिंगडला सुपरफूड असंही म्हटल जातं. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शक्यतो सकाळी अनुशापोटी कलिंगड खाऊन दिवसाची सुरूवात करावी.

cucumber

काकडी
काकडी ही थंड वर्गात मोडत असल्याने या दिवसात तिचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर ठरते. यात व्हिटामिन व मिनरल मुबलक असल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम काकडी करते. काकडीचे सॅलेड,किंवा ज्यूसही सेवन करणे फायदेशीर असते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याबरोबरच शरीरातील पाण्याची कमतरताही काकडीने भरून निघते.

indian-fruits

रसाळ फळे

उन्हाळ्याच्या दिवसात लिंब,द्राक्ष आणि संत्री खाल्ल्याने शरीरालाला फायदा होतो. या फळांमध्ये शरीराला आवश्यक घटक असतात. यामुळे सकाळी संध्याकाळी याप्रमाणे रोज फळे खावीत.

pudina-1

पुदीना
पुदीन्याचा उपयोग चटणी, रायता, सरबत किंवा भाजी बनवण्यासाठी केला जातो. तर काहीजण पदार्थांची चव वाढवण्यासाठी पुदीना वापरतात. पण पुदीना शरीरासाठीही लाभदायी आहे. यामुळे डाएटमध्ये पुदीनाचा वापर आवर्जून करावा.taak

 

 ताक उन्हाळ्यात शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम ताक करते. याती लॅटीक अॅसिडमुळे अन्नपचन होते.तसेच यात कॅल्शियम,पोटॅशियम, आणि झिंकही असते. दूधाच्या तुलनेत ताक पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.

onion-1

कांदा
उन्हाच्या काहीलीपासून बचाव करण्याचे काम कांदा करतो. या दिवसात हवा कोरडी असते.त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. पण कांद्याच्या सेवनामुळे शरीराला होणारे नुकसान टाळता येते.

 

आपली प्रतिक्रिया द्या