मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, योग्य कारवाई करण्याची मागणी

3

सामना प्रतिनिधी, जामखेड

मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावणाऱ्या सय्यद साजिद या समाजकंटकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात सकल मराठा समाज्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदार विजय भंडारी यांना निवेदन देताना सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे, दिपक महाराज गायकवाड, अमोल कसाब, दादासाहेब मोहिते, महेश येवले अशोक मोरे, गणेश मोरे, संभाजी यादव, रवींद्र सपकाळ, अजित जगदाळे, ज्ञानेश्वर बहिर, शंकर पवार, अनिल रोडे, शिवाजी कवडे यांच्यासह अनेक सकल मराठाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनानुसार, अहमदपुर जिल्हा लातुर येथील सय्यद साजिद या समाजकंटकाने जाहीर भाषणात मराठा समाजाला पळवून पळवून पाणी पाजून मारण्याची भाषा केली आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.