बीडमध्ये तब्बल 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

126

सामना प्रतिनिधी, बीड

बीडमध्ये राज्यात सर्वाधिक 36 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लढत मात्र भाजप-राष्ट्रवादी यांच्यात झाली. वंचित आघाडीच्या उमेदवाराने 92 हजार मते घेतली उर्वरित 33 उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले तरीही भाजप. राष्ट्रवादी सोडून एकत्र 34 उमेदवारांनी तब्बल 1 लाख 60 हजार 99 मते घेतली हे विशेष भारतीय जनता पक्षाच्या प्रीतम गोपीनाथ मुंडे या एकूण 6 लाख 78 हजार 175 मते मिळवून विजयी झाल्या.

उमेदवारांची भाऊगर्दी, कोणाची मते खातात, कोणाला फटका देतात याची उत्सुकता होती. या निवडणुकीत बीडमध्ये तब्बल 36 उमेदवार मैदानात होते. म्हणून प्रक्रिया अधिक क्लिष्ट झाली होती. भाजपा – राष्ट्रवादीमध्ये खरा सामना झाला. उर्वरित 34 पैकी वंचित आघाडीच्या उमेदवाराने 92 हजार मताचा आकडा ओलांडला तर 33 उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले तरी यांच्या मताची बेरीज 1 लाख 60 हजाराच्या घरात गेली आहे.

प्रीतम गोपीनाथ मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांना एकूण 6 लाख 78 हजार 175 मते मिळाली आहेत. बजरंग मनोहर सोनवणे (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी) यांना एकूण 5 लाख 9 हजार 807 मते मिळाली आहेत. विष्णु जाधव (वंचित बहुजन आघाडी)यांना एकूण 92 हजार 139 मते मिळाली आहेत. चव्हाण संपत रामसिंग (अपक्ष) यांना एकूण 16 हजार 792 मते मिळाली आहेत. मुजीम नयीमोद़दीन इनामदार (अपक्ष) यांना 6 हजार 152 मते मिळाली आहेत. राजेशकुमार आण्णासाहेब भडगळे (अपक्ष) यांना एकूण 3 हजार 895 मते मिळाली आहेत. जगताप निलेश मुरलीधर (अपक्ष)यांना एकूण 3 हजार 485 मते मिळाली आहेत. विजय रंगनाथ साळवे (अपक्ष) यांना एकूण 3 हजार 456 मते मिळाली आहेत.
अशोक भागोजी थोरात (हम भारतीय पार्टी) यांना एकूण 3 हजार 350 मते मिळाली आहेत. कल्याण भानुदास गुरव (भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्ष) यांना एकूण 286 मते मते मिळाली आहेत. गणेश नवनाथ करांडे (महाराष्ट्र क्रांतीसेना} यांना एकूण 2 हजार 761 मते मिळाली आहेत. रमेश रामकिशन गव्हाणे (दलीत शोषित पिछडा वर्ग अधिकार दल) यांना एकूण 1 हजार 238 मते मिळाली आहेत. शिंदे चंद्रप्रकाश गणपतराव (आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया) यांना एकूण 1 हजार 582 मते मिळाली आहेत.

सय्यद मुजम्मील सय्यद जमील (समाजवादी पार्टी) यांना एकूण 1 हजार 225 मते मिळाली आहेत. सादेक मुनिरोददीन शेख (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी) यांना एकूण 675 मते मिळाली आहेत. अन्वरखान मिर्झा खान (अपक्ष) यांना एकूण 788 मते मिळाली आहेत. कालीदास पंढरीनाथ अपेट (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 550 मते मिळाली आहेत. कोळेकर गणेश भाऊसाहेब (अपक्ष) यांना एकूण 824 मते मिळाली आहेत. खान मजहर हबीब (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 339 मते मिळाली आहेत. गालेबखान जबारखान पठाण (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 209 मते मिळाली आहेत. जमीर शबीर शेख (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 508 मते मिळाली आहेत. जुबेर मुन्शी कुरेशी (अपक्ष) यांना एकूण 778 मते मिळाली आहेत. तुकाराम व्यंकटी चाटे (अपक्ष) यांना एकूण 399 मते मिळाली आहेत.

निसार अहेमद (अपक्ष) यांना एकूण 412 मते मिळाली आहेत. पठाण मुसाखान युनिस खान (अपक्ष) यांना एकूण 585 मते मिळाली आहेत. पठाण सरफराज मेहता खान (अपक्ष) यांना एकूण 633 मते मिळाली आहेत. पाटील यशश्री प्रमोद (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 329 मते मिळाली आहेत. पंडीत दामोधर खांडे (अपक्ष) यांना एकूण 466 मते मिळाली आहेत. बजरंग दिंगबर सोनवणे (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 379 मते मिळाली आहेत. वीर शेषेराव चोखोबा (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 713 मते मिळाली आहेत. अॅड शरद बहिनाजी कांबळे (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 926 मते मिळाली आहेत. शिवाजी नारायणराव कवठेकर (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 989 मते मिळाली आहेत. शेख याशेद शेख तययब (अपक्ष) यांना एकूण 2 हजार 52 मते मिळाली आहेत. शेख सादेक शेख इब्राहीम (अपक्ष) यांना एकूण 1 हजार 322 मते मिळाली आहेत. सय्यद मिनहाज (अपक्ष) यांना एकूण 386 मते मिळाली आहेत. साजन रईस चौधरी (अपक्ष) यांना एकूण 477 मते मिळाली आहेत. तर नोटा 2 हजार 490 मते मिळाली आहेत.

विजयी घोषित झाल्यानंतर श्रीमती प्रीतम मुंडे यांना जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र बहाल केले. यावेळी राज्याच्या ग्रामविकास. महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे. आमदार आर. टी. देशमुख. आ. भिमराव धोंडे. आ. सुरेश धस. आ. लक्ष्मण पवार आणि श्रीमती आ. संगिता ठोंबरे. बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर. निवडणूक निरीक्षक अशोक शर्मा. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे. सर्व विधानसभा क्षेत्राचे सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी व प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी खासदार प्रीतम मुंडे यांचे अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या