टाटांच्या एअर इंडिया एक्सप्रेसला कामगार मंत्रालयाची नोटीस

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसला केंद्रीय कामगार मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विमानसेवा व्यवस्थापन आणि केबिन कर्मचारी यांसदर्भातील काही वादांसंबंधी नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी प्रवासापूर्वी मिळणाऱ्या विश्रांतीवेळी रूम शेअरिंगविषयी तक्रारी केल्या आहेत. तसंच, या खेरीज अन्यही काही तक्रारी आहेत. औद्योगिक विवाद निवारण कायदा 1947 अंतर्गत कामगार मंत्रालयाकडे या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसला नोटीस पाठवण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली होती. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या निकषांचे उल्लंघन केल्यामुळे ही नोटीस आणि दंड ठोठावण्यात आला आहे.