देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे रविवारी संमेलन

सामना प्रतिनिधी । ठाणे

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे वार्षिक स्नेहसंमेन रविवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. नौपाड्यातील ब्राह्मण सेवा संघाच्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनामध्ये गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचाही सन्मान करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेनलनास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेली तीसहून अधिक वर्षे ठाण्यातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ कार्यरत असून आदिवासी भागातील विद्याथ्र्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोलाची मदत झाली आहे. वार्षिक स्नेहसंमेलनात वाद्यवृंद, विद्यार्थी गुणगौरव तसेच परिचय असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या स्नेहसंमेलनास ब्राह्मण ज्ञातीतील बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विलास जोशी व सचिव प्रसाद ठकार यांनी केले आहे.