जिवंत रुग्णाला केलं मृत घोषित आणि…

सामना ऑनलाईन । लखनौ
जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याच धक्कादायक प्रकार लखनौमधील केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये समोर आला आहे. खराब झालेल्या ईसीजी मशिनमध्ये तपासणी केलेल्या रिपोर्टच्या आधारावर ज्युनिअर डॉक्टरने महिला रुग्णाला मृत घोषित केलं. मात्र केजीएमयू ट्रॉमा सेंटरच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि रुग्णाचे प्राण वाचले.  शमसुलनिशा (५०) असं या महिला रुग्णाचं नाव आहे.
पिलिया झाल्यामुळे शमसुलनिशा यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याची स्थिती गंभीर असल्यानं त्यांना मेडिसिन वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं. मेडिसिन विभागाच्या टेक्निशिअनने मशिन खराब आहे याकडे लक्ष न देता खराब ईसीजी मशिनवर शमसुलनिशा यांचे रिपोर्ट्स तयार केले. ते रिपोर्ट पाहून ज्यूनिअर डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टरांचा सल्ला न देता रुग्णाला मृत घोषित करत नातेवाईकांना मृत्यूचा दाखल बनवण्यास पाठवून दिलं. मात्र वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर रुग्ण अद्याप जिवंत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर शमसुलनिशा यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांचे पुन्हा ईसीजी करण्यात आलं, त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले असून त्यांच्यावर आता उपचार सुरू असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.