सोनू, श्रेया आणि अमितराज ‘देवा’ मधून प्रथमच एकत्र

सामना ऑनलाईन । मुंबई

‘देवा एक अतरंगी’ हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या आयुष्यात नवा रंग भरण्यास सज्ज झाला आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित ‘देवा’ या बहुचर्चित सिनेमाचे नवीन गाणे नुकतेच लाँच करण्यात आले. ‘रोज रोज नव्याने’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अभिनेता अंकुश चौधरी व अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

अतरंगी देवा करतोय ए.टी.एम.चा असाही उपयोग

मुरली नलप्पा दिग्दर्शित ‘देवा’ सिनेमातील या रॉमँटीक गाण्याला सोनू निगम आणि श्रेया घोषाल या हिंदीतील गायकांचा आवाज लाभला आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. देवा या चित्रपटामुळे सोनू निगम, श्रेया घोषाल व अमितराज या हिंदी संगीतविश्वातील जोडी प्रथमच मराठी सिनेसृष्टीत एकत्र दिसणार आहे. या गाण्याची श्रेयाही फॅन झाली असून हे माझे आवडते गाणे आहे असेही तिने सांगितले.

‘माया’च्या नजरेतून ‘देवा’ चा शोध! पहा टीझर

हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून यात अंकुश -तेजस्विनीबरोबरच डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळणार आहेत.