सोशल मीडियाच्या माध्यमातून गावाचा विकास


सामना ऑनलाईन , बदनापूर

सोशल मीडियाचा अनेकदा दुरुपयोग झाल्याचे प्रकार नेहमीच आपण पाहतो, परंतु नांदखेडा येथील युवकांनी सोशल मीडियाचा समाजासाठी, गावासाठीही फायदा होऊ शकतो या हेतूने एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून  गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवतात. तसेच काही सदस्यांनी पैसे जमा करीत येथील शाळेला प्रोजेक्टर भेट दिला. याच माध्यमातून शाळा डिजिटल करण्याचा संकल्पही केला आहे.

नांदखेडा येथील काही तरुण नोकरी-रोजगारासाठी गाव सोडून बाहेर गेले, पण गावाच्या ओढीने व संपर्कात राहण्यासाठी त्यांनी एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून नांदखेडा या गावासाठी विविध सामाजिक कार्य करत आहेत. नुकतेच या ग्रुपने पैसे जमा करून येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रोजेक्टर भेट दिला.

बदनापूर तालुक्यातील नांदखेडा हे गाव पुâलंब्री, संभाजीनगर व बदनापूर अशा तिन्ही तालुक्यांच्या सीमेवर हे गाव वसलले असल्यामुळे विकासापासून वंचित आहे. या गावातील काही तरुण रोजगारानिमित्त विविध ठिकाणी गेलेले आहेत. पुणे येथील वंâपनीत काम करीत असलेल्या संतोष उसारे यांनी नांदखेडा नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये नांदखेडा येथील स्थानिक व नोकरी-रोजगारानिमित्त बाहेरगावी स्थलांतरित झालले, असे एवूâण ९५ सदस्य आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी नांदखेडा या गावाचा दुर्लक्षित राहिलेला विकास करण्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. मागील वर्षी या सर्व ग्रुप सदस्यांनी नांदखेडापासून जवळच असलेल्या देवदरी या देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यादरम्यान गावातील व देवदरी परिसरातील जवळपास १ टन प्लास्टिक कचरा नष्ट केला. यासाठी सर्व सदस्यांनी दोन-तीन दिवस सुट्या घेत गावात हा प्लास्टिकमुक्तीचा उपक्रम राबविला. त्यानंतर मागील उन्हाळ्यात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या उपक्रमासाठीही या ग्रुपने मोठे काम केले. सर्व ग्रुप सदस्यांनी यासाठी दोन-दोन दिवस देऊन अनेक ठिकाणी चाऱ्या खोदून पाणी अडवण्याचा उपक्रम राबविला.

कोणत्याही शासकीय मदतीची व राजकीय मदतीची अपेक्षा न ठेवता हा ग्रुप गावाचा विकास करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असतो. शिवजयंतीनिमित्त डॉ. संजय गायकवाड यांचे व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. यंदा जून महिन्यात शाळा उघडल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बघून ग्रुपच्या सदस्यांनी शाळेला डिजिटल करण्याचा संकल्प केला. त्याचाच एक भाग म्हणून ५१ सदस्यांनी यासाठी छोटी-मोठी मदत करीत एक रक्कम उभी केली. त्यातून ४० हजार रुपये किमतीचा प्रोजेक्टर त्यांनी खरेदी करून या शाळेला भेट दिला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत काडेलवार, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप जनबंधू, केंद्रप्रमुख सी. पी. ठावूâर, मुख्याध्यापक बी. एम. चव्हाण, जी. डी. देशपांडे तसेच सरपंच संतोष बोचरे, भारत बोचरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.