गुलाबराव पाटील म्हणजे विकासाचा झंझावात; शिवसेना सहसंपर्कप्रमुख आर. ओ. पाटील यांचे प्रतिपादन


सामना प्रतिनिधी । जळगाव 

मतदारसंघातील प्रत्येक गावाची गरज लक्षात घेऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोट्यवधी रूपयांची विकास कामे केली आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणजे विकासाचा झंजावात आहेत असे गौरवोद्गार माजी आमदार तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आर. ओ. पाटील यांनी कल्यानेहोळ येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी काढले. शिवसेनेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात गुलाबभाऊंचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.

कल्यानेहोळ येथील विविध विकास कामाचे उद्घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व माजी आमदार आर. ओ. पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील,  जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांच्यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी, शिवसेनेचे व युवासेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सरपंच परमेश पाटील यांनी केले.सुत्रसंचालन बाळू अहिरे यांनी केले. तर आभार पंढरीनाथ बोरसे  यांनी मानले.

शिवसेनाप्रमुख व जनतेच्या कायम ऋणात राहील – सहकार राज्यमंत्री पाटील

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोस गावात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्रामस्थांनी घोड्यावर बसवुन मिरवणूक काढली. भाषणात हाच धागा पकडुन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्या लग्नात बैलगाड़ीमधुन वरात निघाली. पण आज घोड्यावर बसवले अशी मिश्किल टिप्पणी केली. जनतेचे हे प्रेम कधीच विसरता येणार नाही. लाल दिव्यापेक्षा तुमच्या प्रेमाचा हा सन्मान मोठा आहे. शिवसेनाप्रमुख व जनतेच्या कायम ऋणात राहील अशी भावना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.