चेन्नईच्या भक्ताची विठ्ठलचरणी 9 लाखांची देणगी

46

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

महाराष्ट्रचे अराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला चेन्नईमधील भाविकाने 9 लाख रुपयांची देणगी दिली आहे. पंढरपूरच्या विठूरायाची ख्याती देशविदेशात वाढून असून विठ्ठलचरणी मोठ्या स्वरुपात देणगी जमा होत आहे. त्यात लाखो रुपयांच्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या वार्षिक ऑडिटमध्ये 14 देशांचे परकीय चलन दानपेटीत आढळून आले आहे. चेन्नईतील विठ्ठलभक्त के. शिवगामी आणि एस. कन्नन यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला शुक्रवारी 9 लाख रुपयांची देणगी दिली आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी या भाविकांचा शाल-श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या