…आणि शरद पवारांचा चेहरा खुलला

1

उदय जोशी । बीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आज बारामतीमध्ये त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातून नेते, आमदार, खासदारांनी हजेरी लावली. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पाडवा शुभेच्छा देताना शरद पवार स्वत: प्रत्येकाशी संवाद साधत होते. त्याचवेळी बीडचे प्रयोगशील शेतकरी यांनी आपल्या बागेतील गोल्डन सीताफळं धर्यशील सोळुंके यांनी पवारांसमोर ठेवली आणि त्यांच्या चेहरा खुलाला. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना मार्गदर्शन करणं असा स्वभाव असलेल्या पवारांना ही भेट मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

सुंदरराव सोळुंके यांचे पुत्र धर्यशील सोळुंके हे ही होते त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या भेट म्हणून हातात सजवलेले टोपले दिले ते पाहून शरद पवार यांचा चेहराच खुलला कारण त्या टोपल्यात होते त्याच्या आवडीचे गोल्डन जातीचे सीताफळ.

बीड येथील शेतीनिष्ठ शेतकरी धर्यशील सोळुंके यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील सुंदरराव सोळुंके राज्याचे पाहिले उपमुख्यमंत्री होते. तब्बल 17 वर्ष विविध खात्याचे मंत्रिपद ही त्यांनी भूषवले. तर धर्यशील सोळुंके यांचे मोठे भाऊ प्रकाश सोळुंके यांनी सतत तीन वेळा माजलगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व केले महसूल राज्यमंत्री पद ही त्यांनी भूषवले. राजकीय पार्श्वभूमी असताना धर्यशील सोळुंके यांचे मन मात्र कधीच राजकारणात रमले नाही. शेतीत वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकऱ्यांसमोर नेहमीच वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला. आपल्या शेतात सीताफळाची बाग फुलवून मोठे आर्थिक उत्पन्न यातून घेतले दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या बागेतील सीताफळं कोलकात्याच्या बाजारात दाखल झाली आहेत. त्यातीलच गोल्डन जातीच्या सीताफळची पेटी पवारांचा घेऊन सोळुंके आज पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीला गेले होते. पवार आज बारामती सर्वांना भेटतात. राजकीय व्यक्तींसोबतच विविध क्षेत्रातील मंडळी देखील पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येथे पोहोचतात. या गर्दीत सोळुंके यांनी शरद पवारांची भेट घेतली शुभेच्छा दिल्या आणि आपल्या शेतातील सीताफळे पवारांना भेट म्हणून दिली, सीताफळाची शेती पवारांना नेहमीच आवडते. शेतीचा विषय निघाला की पवार त्यात रममाण होऊन जातात. गेल्या महिन्यातही त्यांनी बीडमध्ये आल्यावर सोळुंके यांच्या बागेला भेट दिली होती. तेव्हा शेती या विषयावर चर्चा रंगली होती, त्या अनुषंगाने धर्यशील सोळुंके यांनी दिलेल्या सीताफळाचा कौतुकाने स्वीकार केला.

या वेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही त्या ठिकाणी उपस्थित होते.