न्यायालयाच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

90

सामना प्रतिनिधी । बीड

जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर धनंजय मुंडें यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

शहांना तडीपार संबोधणाऱ्या पवारांना धनंजय मुंडे कसे चालतात? धस यांचा सवाल

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स साठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना 5400 कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल
आपण जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळे जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या विरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येते असा आरोप ही मुंडे यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या