परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा

सामना प्रतिनिथी । परळी

निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आणि शेवटही झाला. सत्तेची सुरुवात ज्या परळीतून झाली त्याच परळीतून मस्तवाल सत्तेचा समारोप होईल. भावनिक करण्याचे राजकारण आता नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान खासदार प्रितम मुंडे याच्यावर निशाना साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित आहेत.

मुंडेंच्या परळीत पवारांचा मुक्काम, बड्या नेत्यांसोबत आखणार डावपेच

धनंजय मुंडे आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणाले बीड जिल्ह्याला भकास करण्याचे काम झाले आहे.पाच वर्षात बीड जिल्ह्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत 78 सिंचन प्रकल्प प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प मार्गी लागले असते तर ऊसतोड मजूरांची संख्या निश्चीत कमी झाली असती. ज्या परळीच्या थर्मलवर 10 हजार लोकांचे पोट आहे ते थर्मल बंद करण्याचा घाट घातला जात आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांचे लक्ष आहे का? बीड जिल्ह्याला भावनिक करायचे स्व. गोपीनाथाराव मुंडे यांचे नाव घ्यायचे हे आता चालणार नाही असे म्हणत त्यांनी विद्यामान खासदार प्रितमताई मुंडे यांच्यावरह टिकास्त्र सोडले.