बिग बॉसमध्ये ढिंच्यॅक पूजा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘सेल्फी मैंने ले ली आज’, ‘दिलो का शूटर है मेरा स्कूटर’ अशा बऱ्याच विचित्र गाण्यांमुळे चर्चेत आलेली ‘ढिंच्यॅक पूजा’ लवकरच रिअॅलिटी शो बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. ढिंचॅक पूजा या शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री करणार आहे. त्यामुळे आता रॅपर आकाश दादलानीच्या रॅपसोबत पूजाची गाणी देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या गुरूवारी दिवाळी स्पेशल भागात ती घरात प्रवेश करणार आहे.

ढिंच्य़ॅक पूजासोबस बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी झालेला स्पर्धक प्रियांक शर्मा देखील घरात पुन्हा प्रवेश करणार आहे. प्रियांकने रॅपर आकाश दादलानीला धक्का मारला होता. त्यानंतर या शोचा होस्ट सलमान खानने प्रियांकला घराबाहेर काढले होते. पण प्रियांकची लोकप्रियता पाहता त्याला पुन्हा घरात घेण्यात येत आहे.

दिल्लीतील पूजा जैंन उर्फ ढिंच्यॅक पूजा ही तिच्या विचित्र गाण्यांमुळे काही कालावधीच लोकप्रिय झाली होती. तिच्या या गाण्यांमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती मात्र तरिही पूजाच्या युट्युब चॅनेलला हजारो लाईक्स मिळाले होते. बिग बॉसच्या ११ व्या पर्वाच्या सुरवातीलाच ढिंच्यॅक पूजा या घरात प्रवेश करणार होती अशी चर्चा होती. मात्र पहिल्या १८ स्पर्धकांमध्ये ती न दिसल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे