नवरात्र स्पेशल रेसिपी- शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

साहित्य-
२ वाट्या शिंगाड्याचे पीठ, १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट, २ वाट्या आंबटसर ताक, मीठ, मिरची, आले, जिरे, खायचा सोडा

कृती-
सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे.
२-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे.
नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे.
जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात.
वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.