धोनी आता निवृत्त होणार?

41

सामना ऑनलाईन | लीड्स

जो रुटचे लागोपाठ दुसरे शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात हिंदुस्थानवर ८ गडय़ांनी मात करून तीन सामन्यांची वनडे  मालिका २-१ फरकाने जिंकली. सामना संपल्यानंतर पॅव्हेलियनकडे जाता महेंद्रसिंग धोनीने पंचांकडून चेंडू घेतला अन् सोशल मीडियावर धोनी आता निवृत्त होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले.

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने यष्टी उखडून आपल्यासोबत नेली होती. त्यानंतर धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यावेळीही धोनीने एकदिवसीय मालिका संपल्यावर पंचांकडून चेंडू मागून घेतला. त्याच्या या एका कृतीमुळे चाहत्यांचा काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. धोनी आता निवृत्ती घेणार की काय अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. धोनी पंचांकडून चेंडू घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चाही रंगत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या