कोहलीचा निर्णय चुकला म्हणून सामना हातातून गेला?

सामना ऑनलाईन, बंगळुरु

ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानी संघाचे सलग १० एकदिवसीय सामने जिंकण्याचं स्वप्न उध्वस्त केलं. मात्र याला जबाबदार हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीच असल्याची टीका व्हायला लागली आहे. इंदूरप्रमाणेच याही सामन्यामध्ये हार्दीक पांड्या याला चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. मात्र इंदूरप्रमाणे तो या सामन्यात फार काही विशेष करु शकला नाही. त्याऐवजी धोनीला या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं असतं तर कदाचित सामना हिंदुस्थानी संघ जिंकू शकला असता.

धोनी हा जगातील सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. तो चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला असता तर तो चमत्कार करु शकला असता असं ट्विटरवरुन काही जणांनी मत व्यक्त केलं आहे. पांड्यानंतरही धोनीला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं नाही. त्याच्याऐवजी मनीष पांडेला पाठवण्यात आलं. जोपर्यंत धोनी क्रीजवर आला तोपर्यंत उशीर झाला होता. बंगळुरूतील पराभवामुळे धोनीच्या नावावर कर्णधार म्हणून सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम करण्याचं कोहलीचं स्वप्न भंगलं आहे तसंच ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचं हिंदुस्थानी संघाचं स्वप्नही भंगलं आहे.