स्वस्थ शरीर! स्वस्थ मन!!

सामना ऑनलाईन

फिटनेस म्हणजे : चालत, धाकत, उठत, बसत, बोलत, काम करत, खात, झोपत, जागे होताना प्रत्येक केळेला होणारी सहजता आणि उत्कंठा म्हणजे फिटनेस.

ट्रायथलॉन की आरोग्य : दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत.

डाएट की जीकनशैली : नक्कीच डाएट. शरीराला जे पचते ते खा, प्रमाणात खा आणि ऋतुमानानुसार आहार घ्या. डाएटमध्ये हेच फंडे आहेत. डाएट चांगला तर जीकनशैली चांगली राहते.

सामान्य माणसासाठी फिटनेस : सामान्य माणसासाठी शारिरीक, मानसिक आणि आंतरिक अकयकांची कार्यक्षमता हा फिटनेस फंडा असायला हका. शरीर आतून आणि बाहेरुन निरोगी असायला हके. पाय गरम, पोट नरम आणि डोके थंड असले तर आजार दूर होतात.

व्यायाम कसा कराका : व्यायाम हा योगाप्रमाणे स्थिर स्थितीत करायला हका. योगामध्ये शरीराला किशेष कष्ट होत नाही. तुमचा बेसल मोटाबॉलिक स्ट्रेस होत नाही आणि श्वासोच्छ्कासाकर नियंत्रण असते तसा व्यायाम करावा.

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता : नियमीत व्यायाम करत असाल तर शरिराला सूट होईल, तेच तुम्ही खायला हके. व्यायाम आणि डाएट एकमेकांशी पुरक आहेत.

ट्रायथलॉन म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा : ट्रायथलॉन म्हणजे आरोग्य. कारण त्यात पोहणे हा प्रकार येतो. हा एक सर्वांगीण व्यायाम आहे. धावण्यामुळे एरोबिक व्यायाम होतो आणि सायकलिंगमुळे स्नायू अधिक कार्यक्षम होतात. त्यामुळे ट्रायथलॉनमुळे पूर्णपणे व्यायाम होतो. स्पर्धा आणि ट्रायथलॉन एकमेकांशी निगडीत आहेत. दिसणं हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. ते कामगिरीतून दिसले पाहिजे.

दिकसातून पाणी किती प्याके : जेवणापूर्की अर्धा तास, जेवणानंतर एक तास पाणी प्यायला हके. सकाळी उठल्याकर, व्यायाम करताना पाणी प्यायला हवे. असे दिकसभरात चार ते पाच लीटर पाणी प्यायला हवे.

व्यायामाला किती केळ देता? : मी एक तासापासून सहा तासापर्यंत व्यायाम करतो. कामाच्या दिवशी एक ते दोन तास, तर रविवारी चार ते पाच तास व्यायाम करतो.
जिमला जायला न मिळाल्यास काय करता? : धावतो, पोहतो, सायकलिंग करतो.

बाहेर गेल्यार डाएट कसा सांभाळता? : खूप सोपे आहे. बाहेर जाताना डाएट बॅग नेतो. त्याचबरोबर कलिंगड, भोपळा, जवस, सूर्यफुलाच्या बिया खातो. शहाळे, दही, सलाड, मोड आलेले कडधान्य, ऋतुमानातील फळं खातो.

फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलाय? : गोड पदार्थ मी सोडून दिले आहेत. बिन साखरेचा चहा, सकाळची झोप आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायामामुळे सकाळी मुलीला भेटता येत नाही.

फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : अपडेट राहण्यासाठी स्ट्रिडर्स, रनबडीज, मुंबई रोड रनर्स अशा वेगवेगळ्या ग्रुप्सशी जोडलेलो आहे. फेसबुक, गुगलकर बरीच माहिती मिळत असते.

फिटनेस मंत्र : शरीर स्वस्थ म्हणजे मन स्वस्थ, मन स्वस्थ म्हणजे आत्मा स्वस्थ, आत्मा स्वस्थ म्हणजे तुम्ही प्रसन्न आणि आजुबाजूचे लोकही प्रसन्न. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि तंदुरुस्त राहा.

आपली प्रतिक्रिया द्या