गावाक जातास तर असे जा…

सामना ऑनलाईन, मुंबई

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकण गाठण्यासाठी चाकरमान्यांची जबरदस्त लगबग सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱया एक्सप्रेस गाडय़ा कधीच्याच हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी आता एस.टी. तसेच खासगी गाडय़ांकडे मोर्चा वळवला आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱया भाविकांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रंचड गर्दी होते. अशा वेळी प्रवासादरम्यान गणेशभक्तांना कोणतीही अडचण होऊ नये, त्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जड-अवजड वाहनांना बंदी केली असून ठिकठिकाणी मदत केंद्रे उघडली आहेत. शिवाय मुंबई-गोवा महामार्गावर होणारा वाहतूक खोळंबा टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे.

रायगडात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

मुंबईगोवा महामार्ग अंतर (कि.मी) पर्यायी मार्ग अंतर (कि.मी)

 वाढणारे अंतर 

कळंबोली-पळस्पे फाटा १२.५ कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉइंट करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा १२.८ ०.३
कळंबोली-वाकण ७५.३ मुंबई-पुणे एक्प्रेस वे-खोपोली- पाली-वाकण ७५.७ ०.४

सिंधुदुर्गात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

मुंबईगोवा महामार्ग अंतर (कि.मी) पर्यायी मार्ग अंतर (कि.मी)

वाढणारे अंतर 

कळंबोली-चिपळूण २२७ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-सातारा-उंब्रज – पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट- खेर्डी-चिपळूण-खेर्डी- चिपळूण ३४५

११८

 

कळंबोली-हातखंबा ३०४ मुंबई-पुणे एक्प्रेस वे-सातारा-कराड- वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहूवाडी-आंबा घाट-साखरपा-हातखंबा ४०६

१०२

 

कळंबोली-कणकवली ४११ मुंबई-पुणे एक्प्रेस वे-सातारा-कराड- कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावरून- कळे-गगनबावडा घाट-वैभववाडी- कणकवली ४५६ ४५
कळंबोली-सावंतवाडी ४६५ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-सातारा-कराड- कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली- घाट-सावंतवाडी ४९०

२५