चिन्यांवर विश्वास कसा ठेवायचा?

चीनचा इतिहास विश्वासघातकी घटनांनी भरलेला आहे. हिंदीचिनी भाई भाईचे नारे इकडे आपण देत असताना चिनी सेना आमच्या हद्दीत घुसली होती आम्हाला फार मोठय़ा नामुष्कीस तेव्हा तोंड द्यावे लागले होते. पुन्हा डोकलाम हा एकमेव विषय नाही. चीनच्या बाबतीत इतरही महत्त्वाचे अनेक विषय आहेत. डोकलाममधून तात्पुरती माघार घेतली तरी अरुणाचल ते लेहलडाखपर्यंत त्यांचे उपद्व्याप थांबणार आहेत काय? चिन्यांवर विश्वास कसा ठेवायचा? तेव्हा डोकलामवर राजनैतिक विजय मिळवला या भ्रमात आपण फार राहणे हेच सोयीचे आहे.

डोकलामवर राजनैतिक विजय मिळवल्याचे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने एकतर्फी जाहीर केले आहे. हिंदुस्थान-चीन-भूतानची सीमा असलेल्या डोकलाममधून चीन आणि हिंदुस्थानने परस्पर संमतीने सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शविल्यामुळे दोन देशांतील दहा आठवडय़ांचा संघर्ष तूर्त तरी संपला आहे. चीनने युद्धाच्या धमक्यांचे अस्त्र्ाही वापरून पाहिले. डोकलामच्या भागात सैन्य संचलन केले व युद्धसामग्रीची जमवाजमव केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष लष्करी गणवेशात चिथावणीखोर भाषणे देत राहिले. हिंदुस्थानने माघार घेतली नाही तर गंभीर परिणामास तोंड द्यावे लागेल, या चिन्यांच्या गिधाड-धमक्यांना भीक न घालता आमचे सैन्य डोकलामच्या सीमेवर ठामपणे उभे राहिले. चिनी धमक्यांची हवा त्यामुळे निघून गेली. 1962 सालचा हिंदुस्थान आज राहिलेला नाही, असे जेव्हा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी चीनला ठणकावले तेव्हा तो आततायीपणा वाटला, पण संरक्षणमंत्री जेटली यांचे बोल पोकळ नव्हते तर आत्मविश्वासाचे होते हे आता मान्य करायला हरकत नाही. चीनचे शहर शियामेन येथे ब्राझील, रशिया, हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे व पंतप्रधान मोदी या परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला जाणार आहेत. त्यानिमित्ताने दोन देशांतील डोकलाम तणाव मिटविण्याचा हा प्रयत्न असेल तर ते योग्यच आहे. पण उद्या ‘ब्रिक्स’ परिषद संपन्न झाल्यावर लगेच चिनी सैन्य डोकलामच्या सीमेवर उभे राहिले तर काय करायचे? चीनचा इतिहास अशाच विश्वासघातकी घटनांनी भरलेला आहे. ‘हिंदी-चिनी भाई भाई’चे नारे १९६०च्या सुमारास आपण देत असताना चिनी सेना आमच्या हद्दीत घुसली होती व आम्हाला फार मोठय़ा नामुष्कीस तेव्हा तोंड द्यावे लागले होते. पुन्हा डोकलाम हा एकमेव विषय नाही. चीनच्या बाबतीत इतरही महत्त्वाचे अनेक विषय आहेत. पाकिस्तानपुरस्कृत जो दहशतवाद हिंदुस्थानच्या भूमीवर सुरू आहे त्यास चीनचे खुले समर्थन आहे. लेह-लडाखमध्ये चीनची लाल माकडे सरळ घुसतात व जमिनीवर ताबा सांगतात. अरुणाचलमध्ये व उत्तरांचलमध्येही त्यांची लाल तोंडे नसता उद्योग करीत असतात. डोकलाममधून तात्पुरती माघार घेतली तरी अरुणाचल ते लेह-लडाखपर्यंत त्यांचे उपद्व्याप थांबणार आहेत काय? चिन्यांवर विश्वास कसा ठेवायचा? तेव्हा डोकलामवर राजनैतिक विजय मिळवला या भ्रमात आपण फार न राहणे हेच सोयीचे आहे. चिन्यांवर विश्वास ठेवता येणार नाही!

जबाबदार कोण?

मुंबईत मुसळधार पाऊस झाला व मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची दैना उडाली असे चित्र निर्माण केले जात आहे. सव्वीस जुलैनंतरचा सर्वाधिक पाऊस पडला व तो फक्त मुंबईतच पडला असे नाही, ज्या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नाही तेथेही तो पडला आहे. मुंबई-नाशिक महामार्ग या काळात कोलमडून गेला. मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली; कारण शेवटी सुरक्षेचा व लोकांच्या जीविताचा प्रश्न होता. मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांनी उगाच घराबाहेर पडू नये अशी आवाहने करणे सोपे असते, पण ज्यांचे पोटच हातावर आहे व रोज बाहेर पडल्याशिवाय चूल पेटत नाही त्यांना तर बाहेर पडावेच लागेल. नोकरदार वर्गास बाहेर पडू नका, असे सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच ठरतो. तरीही जीव धोक्यात घालू नका. घरी तुमची बायको-मुले वाट पाहात आहेत, असे एका माणुसकीच्या नात्याने सांगावे लागते. त्यात मुंबई म्हटले की, पालिकेवर ठपका ठेवण्याची आता एक फॅशनच झाली आहे. मग मुंबईसारख्या शहरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे काम नाही काय? की तुम्ही फक्त मुंबईची आर्थिक लुटच करणार आहात. खरे म्हणजे मुंबईची नालेसफाई चोख झाल्यामुळेच चोवीस तासांत पाण्याचा निचरा झाला. मुंबई सात बेटांची बनली आहे व समुद्राने मुंबईस वेढले आहे. भरती-ओहोटीचे प्रकार असतातच. पुन्हा त्या एमएमआरडीएने जे रस्ते खणून ठेवले व जागोजागी ढिगारे केले त्याचे खापर तुम्ही शिवसेना किंवा महापालिकेवर फोडताय हा अन्याय आहे. जे स्वयंभू शहाणे असे आरोप करीत आहेत त्यांच्या ‘कौन्सिलिंग’ची गरज असून पालिका आयुक्तांनी हे प्रयोगही आता जरूर करावेत.

आपली प्रतिक्रिया द्या