व्हॉटस्ऍपने करा डिजिटल पेमेंट

1

सध्याच्या कॅशलेसच्या युगात आणि विशेषतः नोटाबंदीमुळे अनेक लोक डिजिटल पेमेंटचा वापर करू लागले आहेत. पे-टीएमसारख्या अनेक कंपन्यांचे यात प्रचंड उखळ पांढरे झालेले आपण पाहिलेच. अनेक पेमेंट ऍप्सदेखील या काळात निर्माण झाली. सरकारनेदेखील भीम ऍपसारख्या ऍप्लिकेशनची सुविधा निर्माण केली. आता जवळजवळ सर्वच मोबाईलचा एक अविभाज्य घटक असलेल्या व्हॉटस्ऍपद्वारेदेखील डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होत आहे. हिंदुस्थानात येत्या सहा महिन्यांत पर्सन टू पर्सन (पी टू पी) या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉटस्ऍपने आपल्या डिजिटल पेमेंट सेवेसाठी युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) चे साहाय्य घेतलेले आहे. वुईचॅट या मेसेंजर सेवेने चीनमध्ये नुकतीच डिजिटल पेमेंटची सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता त्याचाच कित्ता व्हॉटस्ऍपने इतर देशांत गिरवायला सुरुवात करून एक प्रकारे आव्हानच उभे केले आहे.