‘के दिल अभी भरा नही’चा 250वा प्रयोग संपन्न

11

मंगेश कदम दिग्दर्शित, नाटक मंडळी निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित के दिल अभी भरा नहीया नाटकाचा द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्रयोग नुकताच बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात संपन्न झाला. उतारवयातील जोडप्यांची भावनिक कथा विनोदी अंगाने या नाटकात मांडण्यात आली आहे. जवळच्या सगळ्या लोकांसाठी आयुष्य जगून झाल्यानंतर, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर उरलेले आयुष्य एकमेकांसोबत राहूनही स्वतःसाठी जगणाऱ्या अनेक जोडप्यांची ही कथा या नाटकात दाखवण्यात आली आहे. 250व्या प्रयोगानंतर नाटकाचा गाभा तोच ठेवत नाटकाच्या सादरीकरणात काही बदल करण्यात आले आहेत. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या सहजसुंदर अभिनयाने या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या