Video- मोदींचे भाषण सुरू असताना भाजप खासदार स्टेजवरच झोपले

dilip-gandhi-mp

सामना प्रतिनिधी । नगर

भर कार्यक्रमात किंवा सभागृहात डुलक्या घेताना आपण अनेक राजकारण्यांना पाहिलं असेल. असाच एका व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना खासदार दिलीप गांधी स्टेजवरच झोप घेताना दिसले. हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे.

नगर शहरामध्ये आयुष्यमान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लावण्यात आले. हे भाषण सुरू असतानाच खासदार दिलीप गांधी यांना झोप येऊ लागली. त्यांनी झोप आवरत नव्हती. अखेर त्यांनी मोदींचे भाषण सुरू असतानाच झोप घेतली. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊन साऱ्या नगर जिल्ह्यात त्याची चर्चा रंगली आहे.