दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. 95 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे बुधवारपासून ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

‘सध्या दिलीप कुमार हे अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणेमुळे आम्ही आनंदी आहोत’, अशी प्रतिक्रिया लीलावती रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे यांनी दिली आहे.

दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैजल फारूखी यांनीही दिलीप कुमार यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. ‘दिलीप साहब यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तुमच्या प्रार्थना अशाच कायम राहू द्या’ असे त्यांनी म्हटले आहे.

summary- dilip kumar is recovering from chest infection