दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ

64

सामना ऑनलाईन। मुंबई

कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, भिवंडी येथून अनेक पायी दिंड्या आळंदीच्या दिशेने निघाल्या आहेत. शिवसेनेच्या वतीने शनिवारी खंडाळा येथे या दिंडय़ांचे स्वागत करून वारकऱ्यांना अन्नदान आणि दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच सह्याद्री मानव सेवा मंच, ठाणे यांच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. याप्रसंगी मच्छिंद्र खराडे, दत्ता दळवी, मोहोबत्तसिंग राजपुरोहित, सचिन वाळके, भावेश खराडे, रोहित पांढरे, दत्ता भोईर, गणेश पांढरे, सिद्धू देवकर, मोरेश्वर देवकर, अंकुश बिश्वास, सह्याद्री मानव सेवा मंचाचे डॉ. विश्वास सापरणेकर, ए. डी. जोशी, विनय नापाडे, छाया पंडितराव, नेत्रा तटकरे, ज्योती मुळे, सुरेखा शिंदे, सुलभा दामले, मंगला वझे, प्राध्यापक रंजना वरे, संदीप विनेलकर, सतीश वैती आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या