जपानच्या या हॉटेलमध्ये डायनोसॉर करतात स्वागत!

81

सामना ऑनलाईन । टोकियो

कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यास हसतमुख रिसेप्शनिस्ट आपले स्वागत करतात. मात्र, एखाद्या हॉटेलमध्ये शिरल्यावर अचानक डायनोसॉर समोर आला तर…जपानच्या एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या स्वागतासाठी चक्क डायनोसॉर ठेवण्यात आले आहेत. या हॉटेलात प्रवेशद्वारावरच डायनोसॉरच्या आकाराचे दोन रोबोट्स ग्राहकांचे स्वागत करतात. या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे ग्राहक सुरुवातीला अचंबित होतात. त्यानंतर हॉटेलमध्ये शिरल्यावर त्यांना आश्चर्याचे धक्के बसतात. या हॉटेलमध्ये सर्व कामांसाठी डायनोसॉरच्या आकाराचे रोबोटस् ठेवण्यात आले आहेत.

टोकियोतील ‘द हेन ना हॉटेल’ मधील सर्व कर्मचारी रोबोट्स आहेत. रोबोटद्वारे चालवले जाणारे जगातील हे पहिलेच हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांचे डायनोसॉरच्या आकाराचे रोबोट्स स्वागत करतात. त्यानंतर ते चेक इनसाठी मदत करतात. चेक इनसाठीही रोबोट्स असतात. तिथे तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागते. हे रोबोट इंग्रजी, जपानी, कोरियन आणि चीनी भाषेत संवाद साधण्यास सक्षम आहेत. या हॉटेलच्या प्रत्येक खोलीत ग्राहकांच्या सेवेसाठी डायनोसॉरच्या आकारातील रोबोट्स तैनात आहेत. ते ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करतात. या हॉटेलच्या लॉबीमध्ये एक तरंगणारा मासा दिसतो. विशेष म्हणजे हा मासाही रोबोटिक असून तो बॅटरीवर चालतो.

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही या हॉटेलचे नाव नोंदवण्यात आले आहे. ‘द हेन ना हॉटेल’ या नावाचे पहिले हॉटेल 2015 मध्ये नागासाकीत सुरू करण्यात आले होते. त्याचवर्षी त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले होते. रोबोटसकडून चालवण्यात येणारे पहिले हॉटेल म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. हे हॉटेल चालवणाऱ्या एजन्सीने जपानमध्ये अशाप्रकराची नऊ हॉटेल्स सुरू केली आहेत.

summary – dinosuar robots are the staff of this hotel in japan

आपली प्रतिक्रिया द्या