नागराज मंजुळेचं गायनातही पदार्पण

5

सामना ऑनलाईन । मुंबई

”प्रश्नाला डरला, पडला रे पडला, प्रश्नाला भिडला, जिंकला रे जिंकला” आणि म्हणूनच जग म्हणतं उत्तर शोधलं की नायका जगणं बदलतं! हे शब्द आहेत सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपतीच्या टायटल ट्रॅकचे. सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती? या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची हीच खरी वेळ असल्याचं नागराज मंजुळे नुकत्याच लाँच झालेल्या गाण्यातून सांगत आहेत.

या गाण्याची गंमत म्हणजे कोलंबस आणि गणपत वाणी या दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींचा उल्लेख रंगा गोडबोले यांनी खूप सुंदररित्या केला आहे. तर सादर झालेल्या टायटल ट्रॅक विजय मौर्या यांनीदिग्दर्शित केलं आहे. कागर, नाळसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या नव्या दमाच्या ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी हे गाणं संगीतबध्द केलं असून याला आवाज ही दिला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजेए.व्ही. प्रफुलचंद्रसोबत नागराज मंजुळेंनी ही या गाण्याला आवाज दिला आहे. त्यामुळे यावेळच्या कोण होणार करोडपती? मधून नागराजच्या चाहत्यांना त्याचे दोन नवे पैलू पाहायला मिळतील, असंम्हणायला हरकत नाही.

थोडक्यात काय तर हातावर हात धरून बसल्याने आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी आपण त्या स्वप्नांपर्यंत जाणाऱ्या वाटा शोधणं गरजेचं असतं, या आशयाचं हे टायटल ट्रॅक कोण होणारकरोडपती? च्या मंचाकडे तुम्हाला आमंत्रित करतंय, एवढं नक्की.