पाकड्यांचा ‘डर्टी गेम’

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

पाकड्यांनी त्यांच्या जवानांना खूष करण्यासाठी १०० पश्तून तरूणींचं अपहरण केलं असून त्यांना वेश्याव्यवसायात ढकललं असल्याचं पश्तून कार्यकर्ते उमर खट्टक यांनी म्हटलंय. या तरूणीं पाकिस्तानी जवान रोज बलात्कार करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

स्वात आणि वजिरीस्तान या भागातून या तरूणींना पळवलं गेल्याचं खट्टक यांनी म्हटलंय. या भागातील जनेतवर पाकडे अनन्वित अत्याचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमची गावं उद्वस्त केली जातात, आमच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाते, हे केव्हापर्यंत सहन करायचं असा प्रश्न खट्टक यांच्याप्रमाणे या भागातील असंख्य लोकं विचारत आहेत. पाकड्यांची मस्ती उतरवण्यासाठी त्यांनी आता बंडाचा झेंडा फडकावायचा ठरवलाय. त्यांनी पश्तूनिस्तान नावाचं वेगळं राष्ट्र व्हावं या मागणीसाठी लढवय्यांची फौज उभारायला सुरूवात केली आहे. जागतिक समुदायाने या समस्येकडे लक्ष द्यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.