दिशा पटानी ‘चिटर’, पण टायगर खऱ्या प्रेमात

2

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अफवा पसरत आहेत. पौष्टिक खाणं, व्यायामाकडे काटेकोरपणे लक्ष, डान्ससाठी असलेली आवड अशा एकसारख्या असलेल्या आवडीमुळे दोघेही सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहेत. पण कधी अगदीच राहावलं नाही तर दिशा चटपटीत डीश ताव मारते. मात्र टायगर डाएट जराही बिघडू देत नाही, तो डाएटच्या पूर्ण प्रेमात आहे. त्यामुळे दिशाला काही लोक या बाबतीत ‘चिटर’ म्हणतात असं कळतं.

टायगरने अनेक मार्शल आर्ट फॉर्म्स, किकबॉक्सिंग आणि फुटबॉल यासारख्या खेळांमध्ये मास्टकरी मिळवली आहे, तर दिशा एक प्रशिक्षित जिम्नॅस्ट आहे, ती योगा करते, कार्डिओ आणि वजनावरील नियंत्रण यात तिने प्रशिक्षण घेतले आहे. हे सगळं करत असतानाच दिशाने मात्र ती या प्रथिने आणि व्हिटॅमिनयुक्त डायटला कधीतरी बाजूला ठेऊन चमचमीत खाऊन आपलं डायट मोडत असल्याचं तिने कबूल केलं आहे. याउलट टायगर मात्र कोणतंही जंक फूड न खाता त्याचं डायट जराही चूकवत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतून टायगरने अनेक वर्षांत पिझ्झाही खाल्ला नसल्याचं सांगितलं आहे, त्याच्या अॅब्जवरुन या गोष्टीवर विश्वास ठेऊ शकतो.

टायगरला या फिटनेससाठी अनेक गोष्टींसाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. टायगरने त्याच्या या कडक डायटने, त्याच्या तंदुरुस्त शरीराने संपूर्ण चाहत्यांसमोर एका नवा आदर्श निर्माण केला आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी त्यांच्या आगामी ‘बागी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.