मोदींना शुभेच्छा दिल्या आणि दिशा ट्रोल झाली

84

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

23 मे रोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार यावर शिक्कामोर्तब झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळाले आणि मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटींनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या. मात्र अभिनेत्री दिशा पाटणी यांनी मोदींना 26 मे म्हणजे तब्बल तीन दिवसांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

मोदींना इतक्या उशिरा शुभेच्छा दिल्याने एका युझरने तिला ‘तुमचं स्लो मोशन गाणं आठवलं’ असा टोला लगावला आहे. तर एकाने दिशा इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असं म्हणत खिल्ली उडवली आहे. आणखी एका युझरने तर ‘हॅपी न्यू इयर’ असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या