खाण्यासाठी जगणे आपुले!

16

नाटय़ दिग्दर्शक दिवाकर मोहिते मांसाहार, शाकाहार साऱ्या खाण्यावरच मनापासून प्रेम करणारा कलावंत.

  • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – लोकं जगण्यासाठी खातात. मी खाण्यासाठी जगतो.
  • खायला काय आवडतं? – मांसाहार जास्त आवडतो.स्वतः चांगला कुक असल्याकारणाने पदार्थ स्वतःच बनवायला आणि खाऊ घालायलाही आवडतं. ‘बासा’ नावाचं इंटरनॅशनल फिशही आवडतं.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – दररोज सकाळी जिमला जातो.
  • डाएट करता का? – जे काही खातो ते शरीराला पौष्टिक असावं यादृष्टीने खातो.
  • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – नाटकाच्या प्रयोगाआधीही आणि नंतरही खातो. बाहेर मिळणारे पदार्थ कसे असतील माहित नसतं त्यामुळे पाणी, ज्यूसेस पिण्यावर जास्त भर देतो. शिवाय प्रवासही करायचा असतो.
  • नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आवडलेला खास पदार्थ ? – मशरूम चिज ऑमलेट मी पहिल्यांदा गोव्यात खाल्लं.
  • स्ट्रीट फूड आवडतं का? – कधी मूड आला तर शहापूर रोडला मंटो नावाचा धाबा आहे तिथे आलूचे पराठे खायला जातो. सोबत मित्रपरिवारालाही घेऊन जातो.
  • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – साजूक तूप घातलेलं वरण भात, ताक भात, साखर भात असं खातो. मला साजूक तुपाचं प्रचंड वेड आहे.  घरी चिकन, मासे करायला आवडतात.
  • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – ते शाकाहारी असतील तर झटपट होणारं   दही पालक, स्टार्टरमध्ये पनीर टिक्का,  आवडीनुसार वऱहाडी, कोकणी, पंजाबी, कॉण्टिनेन्टल पदार्थ स्वतः करून घालतो.जिथे जातो तिथून तिथले मसाले आणतो.

ड्राय कोलंबी

कांदा, टोमॅटो, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कोकम, आलं, लसूण पेस्ट कोलंबीला लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं. त्यानंतर तेल तापलं की, त्यात कांदा , खूप कढीपत्ता घालून परतायचं. त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची एक किंवा दोन, टोमॅटो सगळं तेलात परतवून घ्यायचं. टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवायचा. त्यानंतर मॅरिनेशनला ठेवलेली कोलंबी वरून घालायची आणि यातच ती पाणी न घालता शिजवायची. चवीनुसार मीठ घालायचं. आवडीनुसार तिखट घालू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या