मुंबईत निघणार भव्य अपंग रॅली

2

सामना ऑनलाईन।  मुंबई

मुंबईत उद्या मरीन लाईन्सच्या इस्लाम जिमखाना येथे भव्य अपंग रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये सर्वसाधारण अपंग तरुण तसेच युध्कात अपंगत्व आलेले सैनिकही सहभागी होणार आहेत. समाजातल्या अपंग व्यक्तींना प्रौत्साहन आणि उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल या दृष्टीने गेली 10 वर्षे माजी सैनिक आणि कर्मचारी चेंबर ऑफ ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उद्याही अशाचप्रकारे विविध कार्यक्रम रंगणार आहेत.

अपंग व्यक्तिंच्या कुटूंबातल्या सदस्यांना योग्य शिक्षण आणि पूरक व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना व्यवसाय आणि नोकरी मिळवून देण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या भव्य अपंग रॅलीचे उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळई शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, मीना कांबळी, विभागसंघटक जयश्री बळ्ळीकर उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त अपंग तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन सैन्यदलातल्या निवृत्त कमांडर अंशमन ओझा आणि युवन व्हिजनचे प्रथमेश सकपाळ आणि तेजस सकपाळ यांनी केले आहे.