अखेर कोल्हापूरचा गड शिवसेनेने सर केला

133

सामना ऑनलाईन । मुंबई 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे अनेकदा दर्शन घेतले होते. कोल्हापुरात ते अनेकदा गेले होते, परंतु कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या मतदारसंघात आपला खासदार असावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. ही इच्छा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अखेर पूर्ण झाली.

कोल्हापूरचा गड शिवसेनेने सर केला. एक नाही तर दोन खासदार निवडून आले. या दणदणीत विजयानंतर शिवसेना नेते-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेऩाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होत आदरांजली अर्पण केली. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी संपर्क नेते म्हणून रावते यांच्यावर सोपवण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या