स्वागत दिवाळी अंकांचे – ९

मेहता मराठी ग्रंथजगत

यंदाच्या या दिवाळी अंकात रहस्यकथेच्या संदर्भातील विविध पैलू हाताळले आहेत. गूढकथांचे ‘मतकरी’ मॉडेल, रहस्यकथांचे सम्राट : बाबूराव अर्नाळकर, दिवस रहस्यकथांचे, एका ‘शिलेदाराची’ शोकांतिका हे या अंकातील मास्टर स्ट्रोक्स लेख आहेत. दगाबाज (सुश्रुत कुलकर्णी), चेकमेट (लीना सोहोनी), द ब्लू क्रॉस (शुचिता फडके) या अनुवादित रहस्यकथाही थरारक झाल्या आहेत.

संपादक : सुनील मेहता

मूल्य : ३०रु., पृष्ठ : १६०

…………………………………………………

अनीता

यंदाच्या दिवाळी अंकात बहुरंगी, बहुढंगी मुंबई, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोशल मीडियाचे फायदे-तोटे, शिक्षणाचा खेळखंडोबा, मराठी नाटकांची दिशा आणि दशा!, मुलं एवढा ‘टोका’चा मार्ग का अवलंबतात आदी विविध विषयांवरचे लेख वाचनीय आहेत.

संपादक : वैशाली भानुशाली

मूल्य : १००रु., पृष्ठ : ११२

…………………………………………………

दीपावली

७३ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल करणारा हा अंक अनेक विषय घेऊन आला आहे. सत्तांतर झाले की त्याचे परिणाम आपल्या जगण्याला कसे वेढून टाकतात, याविषयी उत्तम कांबळे, हेमंत देसाई, डॉ. अच्युत गोडबोले, जयदेव डोळे आदी वेगवेगळय़ा क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले विचार परखडपणे मांडणारे लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ ठरावे. डॉ. बाळ फोंडके, मिलिंद बोकील, अनिल अवचट यांचे लेख काही वेगळी निरीक्षणं मोडणारी आहेत. डॉ. अरुण द्रविड यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकरांचे रेखाटलेले शब्दचित्र उत्तम आहे. वसंत आबाजी डहाके, महेश केळुसकर, इंद्रजित भालेराव आदी कवींच्या कविता या अंकात आहे.

संपादक : अशोक कोठावळे

मूल्य : १८०रु., पृष्ठ : २५२

……………………………………………….

श्री धन्वंतरी

या अंकात जंतू आणि मानव यांचा संबंध, शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकार साधने, मधुमेह आणि आधुनिक जीवनशैली, ऍक्युपंक्चर योगासने, गुटखा आणि तंबाखूचे दुष्परिणाम, स्त्राrरोग : समज आणि गैरसमज, अवयवदानाची चळवळ, मृत्तिकोपचार (क्ले थेरपी), देशीबाहय़ोपचार, आजीबाईचा बटवा, दासबोधातील आरोग्य संकल्पना, गरोदरपणातील शास्त्राsक्त आहार, मूत्रोत्सर्जन संस्थेचे विकार आदी विषयांवर मान्यवर डॉक्टरांचे उपयुक्त लेख आहेत. अल्टरनेटिव्ह मेडिसीन अर्थात वैकल्पिक चिकित्सेतील ऍक्युपंक्चर, गंध चिकित्सा (आरोमा थेरपी) संमोहन चिकित्सा यासंबंधीही मान्यवरांचे लेख उपयुक्त ठरणारे आहेत.

संपादक : शुभांगी गावडे

मूल्य : ८०रु., पृष्ठ : ९८

……………………………………………….

ऊर्जा

यंदाच्या या अंकातील पर्यावरणप्रेमींचे हाऊस ऑफ बांबू, बुवा, बाबा आणि अंधश्रद्धा – शशिकांत मुद्देखिहाळ, अवर्णनीय युरोप (पूनम दोशी), बालरोगतज्ञ

डॉ. पाटणकर – सुरेखा दांडेकर, स्त्राrभूणहत्या – एक सामाजिक समस्या, डॉक्टर जेव्हा रुग्ण होतो, वृद्धाश्रम नव्हे आनंदाश्रम, मरणानंतरही ते जगतात हे लेख वाचनीय आहेत. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा ‘मी उद्योग मंत्री कसा झालो’ या लेखाचा अंकात समावेश आहे.

संपादक : डॉ. मोहन जोशी

मूल्य : १४०रु., पृष्ठ : १२०

………………………………………………

साभार पोच

कृष्णाकाठ

संपादक : शंभोराज काटकर

मूल्य : १००रु., पृष्ठ : १२८

…………………………………………….

मनोभावना

संपादक : अशोक सावंत

मूल्य : १००रु., पृष्ठ : ३२

…………………………………………….

लोकजागर

संपादक : रवींद्र बेडकिहाळ

मूल्य : १००रु., पृष्ठ : १४८