स्वागत दिवाळी अंकांचे – ८

115

तायांचे जग

यंदाचा हा दिवाळी अंक कला विशेषांक आहे. कलाकारांच्या मुलाखतींमधून त्यांच्या आयुष्याचा प्रवासही उलगडला आहे.  गिरिजा कीर, डॉ. विजया वाड, माधवी कुंटे, गौरी कुलकर्णी, शिवाजी गावडे, जवाहर मुथा, लीला गोवीलकर आदी मान्यवरांचे लेख उत्तम आहेत. माझी म्युरल कथा (तेजश्री मुग्दुम), वारली कथा (देवेंद्र भुजबळ), पारंपरिक कलाप्रकार (डॉ. पल्लवी बनसोडे), वाघ्यामुरळी (डॉ. तनुजा भोसले), संगीत एक सुरेल कला (माया धुप्पड), कला आणि ग्राम संस्कृती (अशोक लोटणकर) हे लेखही कलाविश्वाचा अनुभव देणारे आहेत.

संपादिका : लता गुठे

मूल्य : १३०/- पृष्ठ : १३६.

आम्ही उद्योगिनी

उद्यमशील महिलांचे मुखपत्र अशी ओळख असणाऱया या अंकाचे हे २०वे वर्ष. निरनिराळय़ा क्षेत्रांत उद्योजिका म्हणून यशस्वी महिलांच्या कार्यक्षेत्राविषयी माहिती करून देणारे लेख या अंकात दिलेले आहेत. ते सर्वसामान्य महिलांच्या जिद्दीची कहाणी सांगणारे व त्यातून इतर महिलांना प्रेरणा देणारे ठरले आहेत. याव्यतिरिक्त देशाबाहेरची दिवाळी, दुबईतील दिवाळी, गोव्यातील दिवाळी, पंजाबी दिवाळी, आदिवासी पाडय़ांवरची दिवाळी, कोलकाता येथील दिवाळी, गुजरातमधील दिवाळी, विदर्भातील दिवाळी या लेखांमधून दिवाळीची विविध लोभस रूपे वाचकांना आनंद देऊन जाणारी ठरली आहेत.

संपादिका : मीनल मोहाडीकर

मूल्य : ५०/-, पृष्ठ : ४८

चौफेर

प्रत्येक मराठी माणसाला दिल्लीबद्दल अनाम असं कुतूहल आहे. अशा या दिल्लीबद्दल इतिहास आणि वर्तमानाच्या दुर्बिणीतून वेध घेणारी लेखमाला या अंकाचे वैशिष्टय़ ठरली आहे. दिल्लीतला महाराष्ट्र, मराठा आणि दिल्ली, दावत-ए-दिल्ली, दिल्लीतले दिवस आदी लेख उल्लेखनीय आहेत. निवेदिता खांडेकर, डॉ. सदानंद मोरे, अमृता कदम, राम प्रधान यांनी हे लिखाण केले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्र्ाज्ञ डॉ. जयंत नारळीकरांच्या मिश्किल आणि विनोदी स्वभावाचे किस्से सांगणारा त्यांच्या गणितज्ञ पत्नी मंगला नारळीकरांचा लेख खुमासदार झाला आहे. किरण हणमशेट यांनी रेखाटलेले चित्रशैलीतले मुखपृष्ठ लक्षवेधक!

संपादक : महावीर मद्वाण्णा

मूल्य : २००/-, पृष्ठ : १९६

कृषिवल

मराठी गझल प्रवाह – ए. के. शेख, अवलिया लेखक मंटो-शरद कोरडे, अभिनय कलेच्या तंत्राचा शोध- विजया कुलकर्णी, लळित-प्रकाश खांडगे, भेट ‘नासा’ची – फादर फ्रान्सिस कोरिया, पडद्यावरील स्त्र्ााr प्रतिमा- डॉ. मिलिंद दुसाने, चिनी चहापान- श्रद्धा वार्डे, इस्रो एक विज्ञानमंदिर – राम जोशी, अमेरिकन कंपन्यांचा धुमाकूळ – उदय कुलकर्णी, रायगड कृषी आणि गोपालन आदी विविध विषयांवरील या अंकातील लेख वाचनीय आहेत. तसेच अंतरिक्षातील आव्हान यात्रा, ऑटोमेशनचं आव्हान, मनोरंजन क्षेत्रातील आव्हाने, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आदी नव्या युगातील नव्या आव्हानांचा वेध घेणारे लेख माहितीपूर्ण आहेत.

संपादक : प्रसाद केरकर

मूल्य : १००/-, पृष्ठ : १७५

प्रहार

‘जननेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा दिवाळी अंक आहे. अलका कुबल यांची कन्या ईशानीची गगनभरारी, बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची कन्या दीपिका पदुकोण हिचा रुपेरी प्रवास, शास्त्र्ााrय गायक पं. सी. आर. व्यास यांचा शास्त्र्ााrय संगीताचा वारसा समृद्धपणे पुढे नेणारे त्यांचे पुत्र पं. सुहास, सतीश आणि शशी व्यास यांच्याशी साधलेला संवाद. केसरी टुर्सच्या व्यवसायावर भाष्य करणारा झेलम चौबळ यांचा सविस्तर लेख हे विशेष उल्लेखनीय आहेत. तुमच्या-आमच्यासारखेच सक्षमपणे आईपण निभावणारी गौरी सावंत अन् तिची लेक गायत्री गौरी सावंत यांची कहाणी सांगणारा लेख भावस्पर्शी झाला आहे. दशावतारी ‘बाबी कलिंगण यांची ही कला पुढे नेणाऱया त्यांच्या पुढील पिढीची ओळख करून देणारा लेख या अंकात आहे.

संपादक : विजय बाबर

मूल्य : ७५/-, पृष्ठ : ९५

आहुती

खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती – डॉ. जयंत नारळीकर, अणुऊर्जा- डॉ. अनिल काकोडकर, प्राचीन काळातील पर्यावरण जागृती- प्रा. मेधा सोमण, नॅनो टेक्नॉलॉजी- प्रा. कीर्ती आगाशे, जमिनीखालील पाइपलाइनी- अ. पां. देशपांडे, ज्ञानेश्वर आणि विज्ञान, जंतूपासून निर्जंतुकीकरण, भारतीय महिला शास्त्रज्ञ – प्रवीण कारखानीस, शनिमंदिरातील सौर ऊर्जा उपासना- प्रशांत मोरे आदी विज्ञानाशी संबंधित मान्यवरांचे लेख माहितीपूर्ण आहेत. प्राचीन हिंदुस्थानातील गणितज्ञ आणि खगोलशास्त्र्ाज्ञ भास्कराचार्य यांच्या कार्याचा परिचय करून देणारा प्रा. मोहन आपटे यांचा लेख उत्तम.

संपादक : गिरीश वसंत त्रिवेदी

मूल्य : १५०/-, पृष्ठ : १८८

ऑल दि बेस्ट

या अंकात नामवंतांच्या विनोदी कथा, लेख, व्यंग कविता, वात्रटिका आणि भरपूर व्यंगचित्रांचा समावेश आहे. व्यंगचित्रकार आणि अंकाचे संस्थापक विवेक मेहेत्रे यांचे आधार आणि पॅनकार्डच्या विनोदावर आधारित धमाल मुखपृष्ठ अंकाचे खास आकर्षण आहे. डॉ. जयंत नारळीकरांचा विनोद (डॉ. सुधीर मोंडकर) हा लेख, चंद्रकांत महामिने, प्रियंवदा करंडे, मुकुंद गायधनी इत्यादींच्या कथा, लेख तसेच प्रभाकर झळके, राजेंद्र सरग, विवेक मेहेत्रे, जगदीश कुंटे, सुरेश क्षीरसागर आदींची व्यंगचित्रे हास्यस्फोटक आहेत.

संपादक : वैशाली मेहेत्रे

मूल्य : १५० रुपये, पृष्ठ : १५२

 

स्वातंत्र्यवीर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य, विचारधन, त्यांचे साहित्य आणि त्यांच्या ज्ञातअज्ञात विशेषत्वाविषयीचे मान्यवरांचे लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ असते. यंदाच्या अंकात गोपालक, गोरक्षक सावरकर, क्रांतिकारक सावरकर, सावरकरांचे हिंदुत्व, सावरकर, आज तुम्ही हवे आहात!, गांधी, आंबेडकर व सावरकर, स्वातंत्र्यवीरांचे पसायदान, खरंच सावरकर जातीयवादी होते?, स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले आणि एकमेव हे लेख वस्तुनिष्ठ दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करणारे ठरले आहेत.

संपादक : शंकर दत्तात्रेय गोखले

मूल्य : २००/-, पृष्ठ : १९६.

मनशक्ती बालदोस्तांसाठी

यात मान्यवर लेखक, कलावंतांनी बालदोस्तांसाठी लेखन केले आहे. श्रृती पानसे, वर्षा गजेंद्रगडकर, मयूर चंदने यांचे लेख ज्ञानात भर घालून मुलांना समृद्ध करतील. मोना मेश्राम या हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट टीममधील अग्रगण्य खेळाडूचा प्रवास जाणीव जागृत करणारा ठरेल. हिंदुस्थानातच हिंदुस्थानी विमान तयार करणारे अमोल यादव यांचा प्रेरणादायी प्रवास ‘आकाशाला गवसणी’ (रोहित गोळे) हा लेख उत्तम.

संपादक : श्रीहरी कानपिळे

कार्यकारी संपादक : वर्षा तोडमल

मूल्य : ५०/-, पृष्ठ : ७०

सत्यवार्ता

यंदाच्या अंकात कथा, लेख, चारोळय़ा, कविता, सौंदर्यनिगा, वास्तुशास्त्र्ा, पाककला, वात्रटिका असे अनेक विषय हाताळले आहेत. प्रवास एका स्त्र्ााrचा – प्रभाकर मोरवाले, रांगोळी : अशी तुझी रूपे किती – उमा बंड, महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे, पिता – कन्या नातेसंबंध – ऍड. विजय पवार, संभ्रम – चंद्रकांत कवळी, दांभिकतेचे बळी – प्रकाश लब्धे, दिवाळीतील घर सजावट, आंधळा कायदा – सुमेधा वाळिंजकर आदी लेख आहेत.

संपादक : सतीश भोसले

मूल्य : ४०/-, पृष्ठ : १२८

आपली प्रतिक्रिया द्या