दिवाळीत कुठे फिरायला जाल……

सामना ऑनलाईन। मुंबई

शाळा -कॉलेजेसला दिवाळीच्या सुट्टया सुरु झाल्या आहेत. बाहेरगावी जायचा बेत करत असाल तर या दिवसात हिंदुस्थानात फिरण्यासाठी अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत जी कमी बजेटमध्ये तुम्हांला सुट्टीचा आनंद नक्कीच देऊन जातील.

jaypoor-in-diwali

जयपुर.. या दिवसात फिरण्यासाठी राजस्थान हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. गुलाबी शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या जयपूरमध्ये दिवाळीची वेगळीच धूम असते. येथील नाहरगड किल्ल्यावरची दिवाळी प्रसिध्द आहे. विविध राजवाडे,किल्ले त्यांचा इतिहास, राजसी थाट आणि त्यांना लाभलेली सांस्कृतिक किनार अनुभवयाची असेल तर जयपूरला एकदा तरी जायलाच हवं.

jodhpur-in-diwali

जोधपुर...निळं शहर म्हणूनही ओळखलं जात. दिवाळीच्या रोषणाईत तर ही निळी घरं अधिकच उजळून निघतात. दिवाळीत येथील तलाव व राजमहलांना सजवण्यात येते. हे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात.

varansi-diwali

वाराणसी..दिवाळीत वाराणसीचा घाट रोषणाईने अक्षरश; उजळून निघतो. घाटावरच्या पायऱ्यांवर रोषणाई केली जाते. पावला पावलांवर तेवणाऱ्या पणत्या बघून मन अगदी शांत होते. दिवाळीत येथील प्रत्येक घाटावर हजारो दिव्यांची रोषणाई केली जाते. गंगेची आरती केली जाते. या आरतीमध्ये हजारो नागरिक सहभाग घेतात. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक येतात. येथील काशी विश्वनाथ मंदीरही सजवले जाते.

ujjain-in-diwali

मध्यप्रदेश मधील उज्जैनमध्ये अनेक दर्शनीय स्थळं आहेत. १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक महाकाल ज्योर्तिलिंग उज्जैनमध्ये असून दिवाळीत येथे मोठा महोत्सव असतो. तसेच येथून १०० किमी अंतरावर नर्मदेच्या तीरावर ओकांरेश्वर मंदीर आहे. बाहुबली चित्रपटात दाखवण्यात आलेल्या महाकाय महिष्मती साम्राज्याची राणी ही उज्जैनची होती असे बोलले जाते.

diwali-in-up

उत्तर-प्रदेशमधील भव्य पर्यटन स्थळांपैकी ओरछा हे एक पर्यटन स्थळ आहे. येथील राम काजा मंदीर,ओरछा किल्ला, जहांगीर महाल,चतुर्भुज मंदिर आणि राजा महल ही लोकप्रिय स्थळ आहेत. आजही येथील जनता या मंदिरातील राम राजालाच आपल्या नगरचा राजा मानते.

diwali-in-goa

गोवा..दिवाळीत गो्व्यातील बीचेसवर विशेष रोषणाई केली जाते. येथील बाजारात दिवाळीत विशेष सजावट केली जाते. देशी-परदेशी पर्यटकही बीचवर एकत्रितपणे दिवाळी साजरी करतात.

diwali-in-suvarn-mandir

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर दिवाळीत रोषणाईने उजळून निघते. दिवाळीत येथील लंगरमध्ये खास पक्वानं बनवली जातात.

diwali-in-tripura

उत्तरपूर्वेला फिरायला जायचे असेल तर त्रिपुराला नक्की जायला हवं. उजयंत राजवाडा, उद्यपुर, कमला सागर मंदीर, त्रिपुरसुंदरी मंदीर, रुद्रसागर तलाव, नीरमहल राजवाडा, कल्याण सागर तलाव, सिपाहीवाला अभयारण्यला दिवाळीत सजवले जाते. याच्या रोषणाईने सारा आसमंत उजळून जातो.