खमंग फराळासोबत साजरी करुया दिवाळी

1

saroj-chavan>>सरोज मोहिते

शंकरपाळी

shankerpali

साहित्य- 2 वाट्या मैदा, अर्धा वाटी बारीक रवा, दोन -तीन चमचे वेलची पावडर , 2 वाटी पीठी साखर, तळण्यासाठी तूप, अर्धा लिटर दूध

कृती- एका भांड्यात तूप घ्यावे त्यात पिठीसाखर टाकावी. साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण गरम करावे. कोमट असतानाच त्यात मैदा,रवा टाकावा. हे पीठ नीट मळून घ्यावे.नंतर पोळपाटावर पोळी लाटून त्याचे तिरके काप काढावेत. तूपात तळावेत. शंकरपाळी तयार.

बेसन लाडू

besan-laddu

साहित्य-अर्धा किलो बेसन, पाव किलो तूप, अर्धा किलो पीठी साखर, वेलची पावडर अंदाजाने, अर्धी वाटी काजू व बदामाचे काप.

कृती-कढईत बेसन घ्यावे. खमंग सुंगध येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावे. नंतर त्यात तूप टाकावे. हे मिश्रण लालरंग येईपर्यंत मंद आचेवर परतत राहावे. पीठ थंड होऊ द्यावे. त्यात पीठी साखर टाकावी.. मिश्रण एकजीव करावे. नंतर लाडू वळायला घ्यावेत. प्रत्येक लाडूत एक ड्रायफ्रूट टाकावे.

भाजणीची चकली

chakli-1

साहित्य- लाल तिखट, 1 किलो तांदूळ, अर्धा किलो चना डाळ, 150 ग्रॅम सफेद उडीद डाळ,100 ग्रॅम साबुदाणा आणि पोहे, 1 मोठा चमचा धने, हे सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत व दळून आणावे.

कृती-  एका परातीत 4 कप चकली भाजणी घ्यावी. त्यात 2 मोठे चमचे कडकडीत तेल घ्यावे. त्यात चवीनुसार लाल तिखट व मीठ , सफेद तीळ घालावे. थोडे- थोडे पाणी गरम करून पीठ मळून घ्यावे. पीठ थोडे घट्ट भिजवावे. नंतर चकलीच्या साच्यात पीठ भरावे व चकल्या पाडाव्यात. गरम तेलात तळून घ्याव्यात.

नायलॉन पोह्यांचा चिवडा

nylon-chivda

साहित्य- अर्धा किलो नायलॉन पोहे, 1 कप भाजलेले शेंगदाणे, 1 कप डाळ्या, 7 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, मीठ, पिठीसाखर, जिरेपूड, हिंग, तूप.

कृती- पोहे मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्यावेत. खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, डाळ्या तळून घ्या. नंतर कढईच तूपाची फोडणी देऊन त्यात मिरच्या, कढीलिंब, पोहे, डाळ, दाणे, खोबरं, जिरेपूड, मीठ, साखर घालावी. हे मिश्रण परतून घ्यावे. चांगलं ढवळून घ्या. गार झाल्यावर डब्यात भरावे.

मुगाच्या पिठाचे लाडू

moong-laddu

साहित्य-2 कप मूगाची डाळ 15 मिनिटे भिजवावी, नंतर फडक्यावर वाळवून घ्यावी. त्यानंतर भाजावी, मिक्सरला जाडीभरडी दळून घ्यावी. साखरेचा पाक

कृती- कढईत तूप गरम करून घ्यावे. त्यात डाळ भाजून घ्यावी. पाकात टाकावी. लाडू वळवावेत.