दिवाळीची सुट्टी संपली, सोशल मीडियावर हास्याचे फटाके

सामना ऑनलाईन । मुंबई

दिवाळीच्या पाच-सहा दिवसांची धम्माल उरकून लोक आज कामावर परतले आहेत. मात्र कामावर परत रूजू होताना सगळ्यांची स्थिती कशी झाली आहे यावरून सोशल मीडियावर जोक्सनी धम्माल उडवली आहे.

दिवाळीत दिव्यांची आरास, फराळाचा खमंग सुवास, सुंदर रांगोळ्या, आकर्षक कंदील आणि रोषणाईसोबतच पाहुण्याची रेलचेल असते. दिवाळीत नातेवाईकांना सणाच्या शुभेच्छा देण्यासोबतच आपण या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दिवाळीसाठी खास तयार केलेले जोक्स एकमेकांना पाठवतो. अनेकांना दिवाळीनिमित्त काही दिवसांची सुट्टी होती. व्हॉट्सअप, फेसबुकवर दिवाळीसंबधीचे अनेक जोक फिरत होते. मात्र या जोक्सनंतर आता शनिवारपासून कामावर परतण्याच्या वेळचे जोक्स व्हायरल झाले आहेत.

jokes

jokes1