पालिकेच्या उद्यानांमध्ये विनापरवाना दिवाळी कार्यक्रम

2

सामना ऑनलाईन, पुणे

शहरातील बहुतांश उद्यानांमध्ये आणि बागांमध्ये सध्या दिवाळीनिमित्त दिवाळी पहाटसह  अन्य स्कृतिक कार्यक्रम होत  आहेत. मात्र यापैकी बहुतांशी कार्यक्रम विना परवाना घेतले जात  आहे.  आता पयॆत  केवळ २४ संयोजकांनीच पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची आणि उद्यान विभागाची परवानगी कार्यक्रमासाठी घेतली आहे.

शहरात विविध प्रतिष्ठान, मंडळांकडून सध्या शहरात विविध ठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्याक्रम घेतले जात आहेत. शहरातील मपालिकेच्या बहुतांशी बागांमद्ये आणि उद्यानांमध्ये यापैकी बर्‍यापैकी कार्यक्रम घेतले जात आहेत. या  कार्यक्रमांमुळे होणारे नुकसान विचारात घेऊन उद्यान आणि बागांमध्ये कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी माहिती काही पर्यावरणप्रेमींकडून केली जाते. मात्र तरीही या मागणीकडे दुर्लक्ष करून उद्यान आणि बागांमध्ये कार्यक्रमांना परवानगी दिली जाते.

दिवाळीनिमित्त उद्यान आणि बागांमध्ये वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, दिवाळी पहाट,  सांस्कृतिक कार्यक्रम आदींसाठी केवळ २४ संयोजकांनीच पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची आणि उद्यान विभागाची परवानगी घेतली आहे. त्यामुळे इतर हजारो कार्यक्रम विनापरवानात उद्यान आणि बागांमध्ये घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या उद्यानांमध्ये आणि बागांमध्ये विनापरवाना कार्यक्रम घेणार्‍यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून संबंधातांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली