पुण्यात पोलीस वसाहत मित्रमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे

1

सामना प्रतिनिधी । पुणे

ध्वनिप्रदूषणाचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाच्या डीजे आणि डॉल्बीसारख्या साऊंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घातल्याच्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीत ही बंदी झुगारून डीजे लावण्यात आला. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहत मित्रमंडळाने देखील विसर्जन मिरवणुकीमध्ये मिक्सर आणि थप्पी लावली. बाजीराव रोडवरून मार्गस्थ होत असलेल्या बहुतांश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि मिक्सर लावल्याची माहिती मिळत आहे.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतून डीजे ताब्यात घेतल्याने चार तासांचा रास्ता रोको

याआधी पुण्यातील टिळक रोड व शास्त्री रस्त्यावरील गणेश मंडळांनीही डीजेचा दणदणाट सुरू केला. कात्रज, हडपसरसह उपनगरात डीजेचा आवाज आहे. या प्रकाराकडे पोलीसही सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहेत.