सवर्ण आरक्षणाविरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव

1

सामना ऑनलाईन । चेन्नई 

तमिळनाडूच्या द्रमुक पक्षाने सवर्ण आरक्षणाला विरोध केला आहे. तसेच या आरक्षणाच्या विरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. यापूर्वी पक्षाच्या खासदारांनी संसदेत या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी हे विधेयक सेलेक्ट समितीकडे पाठवावे अशी मागणी केली होती. आरक्षणाचा कोटा आर्थिक आधारावर नसून सामाजिक मागासपणावर आधारित हवा अशी मागणी पक्षाने केली होती.

द्रमुकचे नेते आर एस भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यात आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयांना दिल्या जाणार्‍या विधेयकाला आव्हान दिले आहे. संसदेने नुकतंच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना शिक्षणात आणि नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण दिएल आहे.