जीवनशैली…हृदयाचा व्यायाम

संग्राम चौगुले,[email protected]

स्नायूंबरोबर कार्डिओ अर्थात हृदयाचा व्यायामही आवश्यक असतो…

फंक्शनल ट्रेनिंग म्हणजे आपण ज्या नियमित क्रिया करतो त्या. जसे की  धावणे, हालचाल करणे, उठणे, बसणे, वाकणे, चालणे, सायकलिंग करणे या सगळ्या गोष्टी त्यात आल्या. त्या सगळ्याचा ताण आपल्या पाठीच्या खालील भागावर येतो. जास्त चाललात किंवा पायऱया चढलात तर काही वेळेला पाठीची खालील बाजू दुखते. आपल्या मणक्याला सगळ्या हालचाली जोडलेल्या आहेत आणि या मणक्याला पाठीच्या खालील भागाचा स्नायू मदत करत असतो. त्यामुळे पाठीच्या खालील भागावर ताण पडत असतो. त्यानंतर तुमचे गुडघे आणि मांडय़ा आल्या. याचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी व्यायामशाळेत मशीन असते, पण या मशीनमुळे स्नायूंचा आकार वाढणे, शरीरयष्टी चांगली होणे, वजन कमी होणे या गोष्टी होतात, दिवसभराच्या ज्या फंक्शनल क्रिया असतात त्या  मशीनच्या व्यायामामुळे होत नाही. त्याने केवळ काही ठराविक स्नायूंची ताकद वाढते आणि योग्य बदल होतात.

गेल्या दोन वर्षांत फंक्शनल प्रशिक्षणाचा ट्रेंड वाढला आहे. लोकांना वाटतं, आपण व्यायामशाळेत गेलो की, लगेच शरीरयष्टी सुधारते. फंक्शनल व्यायामाने स्नायूंची कार्यक्षमता चांगली होते. हा व्यायाम दिवसभरात कधीही करू शकता, तो आता व्यायामशाळेत शिकवला जातो.

तुमच्याकडे बॅटल रोप असतो. बॅटल रोपच्या सहाय्याने व्यायाम केला तर तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. खांदा, बाहू, अप्पर, लोअर बॅक, गुडघा असा सगळ्या स्नायूंचा व्यायाम होतो. सगळे स्नायू ताणून धरून बॅटल रोपच्या मदतीने व्यायाम करावा लागतो. हा व्यायाम मशीन न वापरता शिकवला जातो, त्याला फंक्शनल ट्रेनिंग बोलतात. ज्या गोष्टी तुम्ही मशीन न वापरता करता म्हणजे बसणे, उठणे, चालणे, धावणे या सगळ्या गोष्टी फंक्शनल प्रशिक्षणामध्ये येतात आणि हे प्रशिक्षण तुम्हाला आजकाल व्यायामशाळेत दिले जाते.

तरुण मुलांमध्ये फंक्शनलचा ट्रेण्ड

व्यायाम न करता लंजेस व्यायाम प्रकार करू शकता. यामध्ये पुलअप्स, पुशअप्स, ऍब रोलर हे व्यायाम येतात किंवा त्यात तुम्ही एखादे ऑब्स्टॅकल मध्ये ठेवून त्यावर उडी मारणे किंवा क्रॉस ट्रेनिंग करू शकता. त्याला ‘क्रॉस रन’ बोलतात. म्हणजे ऑब्स्टॅकल ठेवायचे असतात. चालायचे, थांबायचे, टर्न घ्यायचा. म्हणजे सातत्याने क्रिया करायची नाही. थांबून, ब्रेक घेऊन पुन्हा लगेच क्रिया करायची. या गोष्टींचे प्रशिक्षण मशीन न वापरता व्यायामशाळेत दिले जाते. सध्या त्याचा ट्रेंड आहे. आता जो पंचवीस ते चाळीस वयोगटांतील वर्ग आहे, तो या व्यायामाकडे जास्त आकर्षित झालेला आहे. कारण या ज्या क्रिया आहेत त्या मॅरेथॉन,  स्विमिंग, सायकलिंग, रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग या ठिकाणी याची मदत मिळते. तसेच कॉलेज तरुणांना कॉलेज इव्हेंटमध्ये त्याचा फायदा होतो.  यंग मुले याकडे जास्त आकर्षित झाली आहेत.

हृदय-फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते

आहार हा नेहमी सारखा असायला हवा. त्यामध्ये जास्त प्रथिने, कमी चरबी असलेले पदार्थ, कमी कर्बोदके असाच असायला हवा, पण फंक्शनल प्रशिक्षण व्यायामानंतर तुम्हाला कॅलरीजची गरज लागेल किंवा तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करता. या व्यायामानंतर तुम्हाला कर्बोदके खावी लागतील. नेहमीच्या ज्या क्रिया आहेत त्या आणखी चांगल्या होतात. कुठलाही त्रास न होता. जसे फंक्शनलमध्ये स्नायू आणि अवयव या दोन्ही गोष्टींचा व्यायाम होतो. हृदय आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्याला हाफ कार्डिओ म्हणता येईल. त्यामुळे फंक्शनल व्यायामाचा ट्रेण्ड जोरदार सुरू आहे आणि तो असाच चालू राहील.