
सामना ऑनलाईन। शांघाय
चीनमधील शांघाय शहरात गेली अनेक वर्ष एक अनोखा बाजार भरतोय. हा बाजार ना कपड्यांचा आहे ,ना मौल्यवान वस्तूंचा. तर हा बाजार आहे चक्क लग्नाचा. येथील पीपल्स पार्कमध्ये दर शनिवारी हा बाजार भरतो. विवाह इच्छुक तरुण तरुणी फेरीवाल्यांप्रमाणे बाजारात आपला बायोडेटा घेऊन फिरत असतात.
एका चीनी वेबसाईटने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार २००५ साली या बाजारास सुरूवात झाली. थंडी असो, पाऊस असो किंवा कडाक्याचे उन असो बाजार मात्र भरतोच. या बाजारात तरुण तरुणी त्यांचे नातेवाईक एकमेकांना आपला परिचय देतात. बायोडेटाची अदलाबदल करतात. त्यातही जर मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडला तर लग्नाची बोलणीही रस्त्यातच होतात. या बाजारात सामान्य नागरिकांपासून श्रीमंत नागरिकां पर्यंतची मुले मुली जोडीदार शोधण्यासाठी येतात. हा बाजार इतका प्रसिद्ध आहे लोकं मॅरेज ब्युरो, किंवा लग्नाच्या संकेतस्थळांवर वधू वर न शोधता या बाजारातच आयुष्यसोबती निवडण्यासाठी गर्दी करु लागले आहेत.
summary…do-you-know-there-is-a-marriage-market-in-china-