गोरेगावमध्ये डॉक्टर तरुणीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । मुंबई

सिद्धार्थ रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नसरीन मेहजबीन सय्यद (२४) हिने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीच चिठ्ठी न मिळाल्याने आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
सिद्धार्थ रुग्णालयात इंटर्नशिप करणारी नसरीन गुरुवारी सकाळी ९ वाजता ड्य़ुटीवर आली नाही. १० वाजून गेले तरी नसरीनचा काही पत्ता नसल्याने रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाला सांगितले.

सुरक्षा रक्षक नसरीन राहत असलेल्या हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावरील खोलीजवळ गेला. आवाज देऊनही ती दार उघडत नव्हती. दरवाजा तोडला त्यावेळी नसरीन पंख्याला गळफास लावलेल्या स्थिती आढळली. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून गोरेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.