प्रेयसीला जाब विचारणाऱ्या डॉक्टर पत्नीला, डॉक्टर पतीची मारहाण

16
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । बदलापूर

दवाखान्यातच डॉक्टर पतीसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणीला पत्नीने जाब विचारल्याच्या रागातून डॉक्टरने स्वत:च्याच डॉक्टर पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना बदलापुरात घडली आहे. माझ्या प्रेयसीला जाब विचारायची तुझी हिंमत कशी झाली, असे म्हणत दवाखान्यातच डॉक्टरने हंगामा केला.

बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी भागात राहणारे हे डॉक्टर दाम्पत्य आहे. पतीचा बेलवली भागात तर पत्नीचा सानेवाडी भागात दवाखाना आहे. शनिवारी रात्री आठ वाजता पतीच्या दवाखान्यात गेली. त्यावेळी पती आणि त्याची प्रेयसी गप्पा मारत बसल्याचे कळताच महिला डॉक्टरने तेथे येऊन प्रेयसीला जाब विचारला. याचा राग आल्याने या डॉक्टर पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टर पत्नीची करंगळी फ्रॅक्चर झाली. डॉक्टर महिलेच्या फिर्यादीवरून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खबऱ्याचा एक फोन आणि…
डॉक्टर महिला तिच्या दवाखान्यात पेशंट पाहत असताना पतीच्या दवाखान्यात त्यांची प्रेमिका आली असल्याचा फोन खबऱयाने केला. यानंतर डॉक्टर पत्नी तत्काळ पतीच्या दवाखान्यात पोहोचली आणि मग एकच हंगामा सुरू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या