अबब! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला चार किलोचा ट्यूमर

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतील गंगा राम रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून चार किलो वजनाचा ट्यूमर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला रुग्णालयात आली तेव्हा नऊ महिन्याच्या गरोदर महिले इतके तिचे पोट वाढले होते. तीन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर मोठ्या शर्थीने डॉक्टरांनी तिच्या पोटातील ट्यूमर काढला आहे.

डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि ती कँडी क्रश खेळत होती

या महिलेच्या पोटात ट्यूमर असल्याचे निदान २००९ साली झाले होते. त्यावेळी तो ट्यूमर अवघा ३सेंटीमीटरचा होता. या ट्यूमरमुळे तिला पोटात दुखायचे तसेच सतत रक्तस्त्राव देखील व्हायचा. मात्र तरिही तिने त्यावर योग्य तो उपाय केला नाही. गेल्या दहा वर्षांपासून ती हे दुखणे सहन करत होती. या वर्षी जानेवारी महिन्यात गंगा राम रुग्णालयात आली. तेथे डॉक्टरांनी तिच्या विविध चाचण्या केल्या. गेल्या दहा वर्षात तिचा ट्यूमर दहा पटीने वाढून तो २३ सेटींमीटरचा झालेला होता. स्तनांच्या खालच्या हाडापासून ते ओटीपोटापर्यंत हा ट्यूमर पसरला होता. गेल्या आठवड्यात या महिलेवर शस्त्रक्रीया करून तिच्या पोटातील हा ट्यूमर काढून टाकण्यात आला.

‘अनेक कारणांनी ही एक वेगळी केस ठरली आहे. या महिलेने एवढ्या भयंकर ट्यूमरकडे दुर्लक्ष का केले हे एक कोडेच आहे. तसेच आता पर्यंत एखाद्या महिलेच्या शरीरातून एवढा मोठा ट्यूमर काढण्याची ही पहिलीच वेळ आहे’, असे महिलेवर उपचार करणारे डॉक्टर देबासिस दत्ता यांनी सांगितले.

SUMMARY : Doctors remove a giant tumour weighing 4kg from woman’s body